आयुर्वेदाच्‍या दृष्‍टीने ऋतूची लक्षणे दिसू लागली की, ऋतू चालू होणे

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १५७

वैद्य मेघराज पराडकर

‘चैत्र-वैशाख (हा) वसंत ऋतू’ असे आपण शाळेत शिकलेलो आहोत. हे कालमापनाच्‍या दृष्‍टीने योग्‍य आहे; परंतु आयुर्वेदाच्‍या दृष्‍टीने ‘जेव्‍हा ऋतूची लक्षणे दिसू लागतात, तेव्‍हा तो ऋतू’, असे म्‍हणतात. सध्‍या फाल्‍गुन मास चालू आहे. यानुसार खरेतर ‘शिशिर ऋतू’ आहे; परंतु आता थंडी न्‍यून होणे, दुपारी कडक ऊन पडू लागणे, झाडांना नवी पालवी येऊ लागणे ही वसंत ऋतूची लक्षणे दिसण्‍यास आरंभ झाला आहे. त्‍यामुळे हळूहळू आता थंडीच्‍या दिवसांतील ऋतूचर्या (ऋतूनुसार आयुर्वेदाचे नियम) सोडून वसंत ऋतूचर्या आचरणात आणायला हवी.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.२.२०२३)

या मालिकेतील आतापर्यंतचे सर्व लेख एकत्र वाचण्‍यासाठी bit.ly/ayusanatan या लिंकला भेट द्या !