माण तालुक्यात ३.६ रिक्टर स्केलचा भूकंप !
सातारा, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – जिल्ह्यातील पळशी-धामणी येथे २६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी १०.३१ वाजता ३.६ रिक्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. याची नोंद कराड भूकंपमापन केंद्रात झाली आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू माणपासून ५ किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही. भूकंपाची तीव्रता अल्प असल्यामुळे तो काही ठिकाणी जाणवलाही नाही. नागरिकांनी भूकंपामुळे घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.