इस्‍लामचा उदोउदो थांबवा !

केंद्रशासनाने नुकतेच ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ असे नामकरण करण्‍यास अनुमती दिली. सर्वच हिंदूंसाठी ही आनंदाची गोष्‍ट आहे. ज्‍या निर्णयाची हिंदू वर्षानुवर्षे प्रतीक्षा करत होते, त्‍या निर्णयाची पूर्तता झाल्‍याने हिंदूंना दिलासा मिळाला. आता तेथील रेल्‍वेस्‍थानक, बसस्‍थानक, विमानतळ, पोलीस ठाणी अशा सर्वच ठिकाणी ‘संभाजीनगर’ नाव दिसल्‍यास हिंदूंना खर्‍या अर्थाने समाधान वाटेल. हिंदूंसाठी हे वृत्त जरी आनंददायी असले, तरी या नामकरणाला विरोध करणार्‍यांची संख्‍याही भारतात काही न्‍यून नाही. केंद्रशासनाचा आदेश आल्‍यावर सर्वांचीच ‘टिवटिव’ पुन्‍हा चालू झाली. ‘आम्‍ही याला विरोध करणार’, ‘आम्‍हाला औरंगाबाद हेच नाव हवे’, असेही विरोधक म्‍हणू लागले. संभाजीनगर जिल्‍ह्याचे खासदार आणि एम्.आय.एम्.चे नेते इम्‍तियाज जलील हे या वादात उतरले नाही, तरच नवल ! ‘आमचा छत्रपती संभाजी महाराज यांना विरोध नाही; पण पूर्वीप्रमाणे मी ‘संभाजीनगर’ नावाला विरोध केला आणि यापुढेही करीन’, अशी गरळओक जलील यांनी पुन्‍हा एकदा केलीच ! जर छत्रपती संभाजी महाराजांना विरोध नसेल, तर क्रूरकर्मा औरंगजेबाने अत्‍याचार करून त्‍यांचे हाल करून त्‍यांना ठार मारले, लक्षावधी हिंदूंचीही हत्‍या केली, याविषयी जलील काहीच का बोलत नाहीत ? अशा क्रूरकर्म्‍याचे नाव शहराला का बरे द्यावे ? थोडक्‍यात काय, तर एकीकडे छत्रपती संभाजी महाराजांना विरोध नाही म्‍हणायचे आणि त्‍या आडून औरंगजेबाचे समर्थन करायचे, ही जलील यांची नीती आहे. याआधीही संभाजीनगर नामकरणासाठी काढलेल्‍या अध्‍यादेशात ‘संभाजीनगरचा उल्लेख करून स्‍वाक्षरी करणार्‍या अधिकार्‍याने त्‍यागपत्र द्यावे अथवा त्‍याला बडतर्फ करण्‍यात यावे’, अशी मागणी जलील यांनी केली होती. अधिकाराची भाषा वापरून हिंदुद्रोही विधाने करत रहायची, हाच एम्.आय.एम्.चा उद्देश आहे. हिंदुद्वेषाची कावीळ झालेल्‍यांकडून याहून वेगळे काय घडणार ? स्‍वातंत्र्यानंतर इतकी वर्षे ‘औरंगाबाद’ याच नावाचे पालुपद चालू ठेवण्‍यात आले, हे सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांसाठी लज्‍जास्‍पदच आहे. राष्‍ट्रवादी काँग्रेसनेही छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ ऐवजी ‘स्‍वराज्‍यरक्षक’, असे संबोधण्‍यास सांगितले होते. भारतावर ६० वर्षे राज्‍य केलेल्‍या काँग्रेसच्‍या काळात केवळ  मुसलमानांचे लांगूलचालन करण्‍यात आल्‍याने शहरे किंवा जिल्‍हे यांच्‍या नामकरणाचा प्रश्‍नच उद़्‍भवला नव्‍हता; पण हिंदूबहुल शासन सत्तेत आल्‍यानंतरच असे विषय समोर येऊ लागले. काँग्रेस जर अजून सत्तेत राहिली असते, तर देशातील जिल्‍हे, राज्‍ये, तसेच गल्‍ल्‍या यांची नावे इस्‍लामी आक्रमकांचीच आपल्‍याला पहायला मिळाली असती, हे निश्‍चित !

इस्‍लामी आक्रमकांचीच आपल्‍याला पहायला मिळाली असती, हे निश्‍चित !

राज्‍यशासनाने संभाजीनगरच्‍या नामकरणाचा विषय चालू केला होता; पण केंद्रशासनाने अंतिम मान्‍यता दिलेली नव्‍हती. असे असतांनाही अनेकांनी ‘संभाजीनगर’ असे नाव वापरण्‍यास प्रारंभ केला होता. यातून नागरिकांमधील उत्‍साह आणि त्‍यांचे हिंदुप्रेमच दिसून आले. वैजापूर (संभाजीनगर) येथील ‘शिवप्रहार प्रतिष्‍ठान’ आणि ‘शिवशंभूभक्‍त परिवार’ यांनी ‘संभाजीनगर’ नामकरणासाठी आयोजित केलेल्‍या कार्यक्रमात सहस्रो युवकांनी सहभाग घेऊन नामांतराला समर्थन दिले. अनेकांनी यासाठी मोहिमा राबवल्‍या. शासन आणि प्रशासन यांच्‍या स्‍तरावर निवेदने देण्‍यात आली. हिंदुत्‍वनिष्‍ठांनी आंदोलने केली. याची पोचपावती हिंदूंना केंद्रशासनाच्‍या निर्णयातून मिळाली.

गोव्‍यातील हिंदूंची सतर्कता !

हे झाले संभाजीनगरविषयी ! आता थोडे गोव्‍याकडे वळूया. कळंगुट येथे बाजाराचे चित्रीकरण करणार्‍या धर्मांध मुसलमानाने तेथील एका भागाचा उल्लेख ‘पाकिस्‍तान गल्ली’ आणि ‘मुसलमान गल्ली’ असा केला; पण तेथील सतर्क राष्‍ट्रप्रेमी हिंदूंनी त्‍याला गुडघ्‍यावर उभे करून कान पकडायला लावून क्षमा मागण्‍यास, तसेच त्‍याला ‘भारतमाता की जय’ अशी घोषणा देण्‍यास भाग पाडले. गोव्‍यासारख्‍या घटना अन्‍य ठिकाणीही न्‍यून-अधिक प्रमाणात घडतच असतील; कारण स्‍वातंत्र्योत्तर भारतातही आपल्‍याला इस्‍लामी मानसिकतेचेच उघड उघड दर्शन होते. इस्‍लामीप्रेमींना हा भारत देश आपलाच वाटतो. त्‍यामुळे अशा स्‍वरूपाची नावे दिली, तरी त्‍यांना त्‍यात काहीच चुकीचे वाटत नाही. गोवा येथे हिंदूंनी तत्‍परतेने विरोध केला म्‍हणून प्रकरण मिटले, अन्‍यथा काही वर्षांनंतर तेथील संबंधित परिसर ‘पाकिस्‍तान गल्ली’ आणि ‘मुसलमान गल्ली’ अशा नावानेच ओळखला गेला असता. मग ‘कोणे एके काळी एका मुसलमानानेच याचे नामकरण केले होते’, अशीही कथित कथा सांगितली गेली असती. इतकाच जर पाकचा पुळका येतो, तर मग असे धर्मांध मुसलमान तेथेच जाऊन का रहात नाहीत ? खायचे-प्‍यायचे भारताचे आणि उदोउदो मात्र पाकचा करायचा. हे असले धंदे अधिक काळ चालू द्यायचे नाहीत. हिंदूंनी अशा राष्‍ट्रद्रोह्यांना वेळीच वठणीवर आणावे.

पुढची पावले कोणती ?

भारतातील सर्वत्रची इस्‍लामी आक्रमकांची नावे असलेली शहरे, तालुका, गावे किंवा गल्‍ल्‍या यांचीही नावे पालटण्‍यासाठी हिंदूंनाच कष्‍ट घ्‍यावे लागणार आहेत. त्‍यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि प्रबोधन करण्‍याची आवश्‍यकता आहे. इस्‍लामी आक्रमकांच्‍या खुणा मिटवणे, हे प्रत्‍येकाचे राष्‍ट्रकर्तव्‍य आहे. देशाला स्‍वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाल्‍यानंतरही आपण आक्रमकांची नावे उच्‍चारून त्‍यांचा उदोउदो करतो, हा एक प्रकारचा राष्‍ट्रद्रोहच होय, हे लक्षात घ्‍यायला हवे. हिंदूंनो, केवळ नामकरणाच्‍या आनंदावर समाधान न मानता औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा कसा छळ केला ? हा इतिहासही विद्यार्थ्‍यांना शिकवायला हवा. त्‍यासाठी शासनाकडे मागणी करावी लागेल. काँग्रेसने इतकी वर्षे ‘संभाजीनगर’ हे नाव कसे दडपून ठेवले होते, हेही जनतेसमोर यायला हवे. खुलताबाद येथे असलेले औरंगजेबाचे थडगे शासनाकरवी उद़्‍ध्‍वस्‍त करायला हवे. तसे झाल्‍यासच खर्‍या अर्थाने राष्‍ट्रकर्तव्‍य पार पाडता येईल !

संभाजीनगरच्‍या नामांतरावर समाधान न मानता औरंगजेबाचा क्रूरतेचा इतिहास शिकवण्‍याची मागणी लावून धरा !