सरकारने हिंदूंच्या संयमाचा अंत न पहाता ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’ विरोधात कायदा करावा ! – माजी आमदार संदीप नाईक
नवी मुंबई येथे जनआक्रोश मोर्चा
नवी मुंबई, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदु समाज संयमी आहे; मात्र त्याच्या संयमाचा अंत पाहू नका, सरकारने लवकरात लवकर लव्ह जिहाद आणि लँड जिहाद विरोधातील कायदा करावा, असे आवाहन माजी आमदार संदीप नाईक यांनी वाशी येथे केले. सकल हिंदु समाजाच्या वतीने आयोजित जनआक्रोश मोर्च्यामध्ये पत्रकारांना प्रतिक्रिया देतांना ते बोलत होते.
‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ विरोधातील कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करावा, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. वाशी सेक्टर-२८ पासून या मोर्च्याला प्रारंभ झाला. भगवे झेंडे, लव्ह जिहाद विरोधातील घोषणा फलक हातात घेऊन सहस्रो हिंदू मोर्च्यामध्ये सहभागी झाले होते.
या वेळी ‘यह प्रेम नही यह धोका है ।’, ‘गर्व से कहो हम हिंदू है ।’, ‘लव्ह जिहादविरोधी कायदा झालाच पाहिजे’, ‘वन्दे मातरम् ।’, ‘जय श्रीराम ।’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी वाशी परिसर दणाणून गेला होता.
मोर्च्यामध्ये भाजपचे आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील, भाजपचे आयटी सेल प्रमुख सतीश निकम, अनेक माजी नगरसेवक, भाजप, शिवसेना, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, वारकरी संप्रदाय आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार गणेश नाईक म्हणाले, ‘‘मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न केले जाते, यानंतर धर्मांतरासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जातो. तरुण पिढीला अमली पदार्थांच्या आहारी लावून त्यांना कमजोर केले जात आहे. हे सर्व थांबणे आवश्यक आहे. यासाठी लव्ह जिहाद, लँड जिहाद विरोधात कायदे करणे आवश्यक आहे.’’
माजी आमदार संदीप नाईक म्हणाले, ‘‘लव्ह जिहाद विरोधात आजचा हा जनजागरण मोर्चा आहे. लव्ह जिहादच्या माध्यमातून मुलींवर धर्मांतरासाठी अत्याचार केले जातात. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने धर्मांतर बंदी कायदा लवकर करावा. बांगलादेशी घुसखोरांमुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. भारतियांच्या हक्कावर डल्ला मारणार्या या घुसखोरांना देशाबाहेर हाकलून लावणे आवश्यक आहे.’’
मोर्च्याची सांगता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झाली.
प्रमुख वक्त्या म्हणून मोर्च्याला संबोधित करतांना काजल हिंदुस्थानी म्हणाल्या, ‘‘धर्मांध सापांना दूध पाजू नका, ते विषारी फुत्कारच सोडणार आहेत. अशा जिहादींवर आर्थिक बहिष्कार टाका. नवी मुंबईत लँड जिहाद चालू आहे. नेरुळ, टी एस् चाणक्य येथेही दर्गा आहे. राष्ट्रीय सुरक्षेविषयी धोका असल्याचा अहवालावर केंद्र सरकारने तो दर्गा तोडण्यास सांगूनही नवी मुंबई महापालिका तो तोडत नाही. एपीएमसी मार्केटमध्ये ८ अनधिकृत मशिदी, नवी मुंबई येथील सर्व रेल्वे स्थानकांच्या ठिकाणी दर्गा आणि मशिदी बनवल्या आहेत. या समाजाला बोट दिले की, ते तुमची कॉलर पकडतात. त्यांना कितीही दिले, तरी ते कमीच आहे, त्यांना तुमच्या अस्तित्वातची अडचण आहे. ‘लव्ह जिदाह’ आणि ‘लँड जिहाद’ चालू असल्याने या समाजावर वेळीच आर्थिक बहिष्कार करणे आवश्यक आहे. तसेच सरकारने याविषयी कठोर कायदे करावे.
Amidst a sea of saffron flags and posters condemning ‘love jihad’, sloganeering protesters marched for about 3 km from Vashi’s Blue Diamond Chowk to Shivaji Chowk. #NaviMumbai #Vashi
https://t.co/ccqjbgRIbB— The Indian Express (@IndianExpress) February 27, 2023
नवी मुंबईत ‘लँड जिहाद’ पसरत आहे ! – मनीषाताई भोईर
‘लँड जिहाद’ हा नवी मुंबईतही पसरत असून सानपाड्यात केवळ दीड टक्का मुसलमान लोकसंख्या असलेल्या ठिकाणी मशीद उभारण्यास तेथील हिंदूंनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून प्रखर विरोध करून लढा जिंकला. असे प्रकार करण्याचे अनेक प्रयत्न धर्मांधांकडून केले जातात म्हणून आपण संघटित होऊन प्रतिकार करणे आवश्यक आहे.