जिहादींवर आर्थिक बहिष्कार टाका ! – काजल हिंदुस्थानी
वाशी (नवी मुंबई) येथे विराट जनआक्रोश मोर्चा
नवी मुंबई – धर्मांध सापांना दूध पाजू नका, ते विषारी फुत्कारच सोडणार आहेत. अशा जिहादींवर आर्थिक बहिष्कार टाका, असे आवाहन काजल हिंदुस्तानी यांनी वाशी येथे केले. सकल हिंदु समाजच्या वतीने लव्ह जिहाद आणि लँड (भूमी) जिहाद यांच्या विरोधात वाशी येथे ‘विराट जनआक्रोश मोर्च्या’चे २६ फेब्रुवारी या दिवशी आयोजन करण्यात आले होते. वाशी सेक्टर २८ ते वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. विविध मान्यवरांनी मोर्च्याच्या समारोपाच्या वेळी त्यांचे विचार मांडले. मोर्च्यामध्ये सहस्रो हिंदू सहभागी झाले होते.
या मोर्च्यामध्ये प्रमुख वक्त्या म्हणून संबोधित करतांना काजल हिंदुस्थानी पुढे म्हणाल्या, ‘‘नवी मुंबईत लँड जिहाद चालू आहे. नेरूळ येथे दर्गा बनवला, मनपा सिडको येथे दर्गा बनला, टी.एस् चाणक्य येथेही दर्गा आहे. राष्ट्रीय सुरक्षेविषयी धोका असल्याचा अहवाल येऊन आणि केंद्र सरकारने तो तोडण्यास सांगूनही नवी मुंबई महापालिका तो तोडत नाही. ए.पी.एम्.सी. मार्केटमध्ये ८ अनधिकृत मशिदी, नवी मुंबई रेल्वेस्थानक येथे दर्गे आणि मशिदी बनवल्या आहेत. या समाजाला बोट दिले की, ते तुमची कॉलर पकडतात. यांना कितीही दिले, तर अल्पच आहे. त्यांना तुमच्या अस्तित्वाची अडचण आहे. लव्ह जिदाह आणि लँड जिहाद चालू असल्याने त्यांचा वेळीच आर्थिक बहिष्कार करणे आवश्यक आहे. सरकारने याविषयी कठोर कायदे केले पाहिजेत.’’
त्या पुढे म्हणाल्या की, लँड जिहाद हा नवी मुंबईतही पसरत चालला आहे. सानपाड्यात केवळ दीड टक्का मुसलमानांची लोकसंख्या असलेल्या ठिकाणी मशीद उभारण्यास तेथील हिंदूंनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून प्रखर विरोध करून लढा जिंकला. असे प्रकार करण्याचे अनेक प्रयत्न धर्मांधांकडून केले जातात म्हणून आपण संघटित होऊन प्रतिकार केला पाहिजे.