पुणे येथील ‘जलसंपदा’तील उपविभागीय अधिकारी लाच घेतांना सापडले !
पुणे – पूररेषेच्या आत भूमीचे सपाटीकरण केल्याने कारवाईची भीती दाखवून जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी तुळशीदास आंधळे यांनी ७ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील साडेतीन लाख रुपये स्वीकारतांना आंधळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. तक्रारदार यांनी खेड तालुक्यातील कोळीए येथील भूमीचे सपाटीकरण आणि भूमी विकसित करण्याचे काम चालू केले होते. त्या ठिकाणी जाऊन आंधळे यांनी ‘तुम्ही पूररेषेच्या आत काम करत आहात’, असे सांगून कारवाई करण्याची धमकी दिली, तसेच ७ लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदाराला लाच देणे मान्य नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.