आजारपणाच्या काळात साधक वसतीगृहात एकटाच असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सूक्ष्मातून आधार देणे
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. वसतीगृहात असतांना मन मोकळे करण्यासाठी कुणीही नसणे
‘मी गेल्या एक वर्षापासून मुलांच्या वसतीगृहात रहाण्यास आरंभ केला. त्या वेळी मला कधीही एकटेपणा जाणवला, तर मी माझी मनःस्थिती कोणाजवळही व्यक्त करू शकत नव्हतो. मी आई-बाबांशी बोलल्यानंतरही ‘माझे मन मोकळे झाले आहे’, असे मला वाटत नसे.
२. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले सूक्ष्मातून सतत समवेत आहेत’, असे जाणवणे
त्या वेळी गुरुदेवच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) सूक्ष्मातून माझ्या समोर यायचे आणि ते मला म्हणायचे, ‘‘विनायक, तू एकटा नाहीस. मी तुझ्या समवेत आहे. मग तू काळजी कशाला करतोस ? जेव्हा तुला एकटेपणा जाणवेल, तेव्हा मी तुझ्या समवेत राहीन.’’ तेव्हापासून ‘गुरुदेव सतत माझ्यासह आहेत’, याची मला जाणीव होऊ लागली.
३. शारीरिक त्रासांचे प्रमाण वाढणे
जून २०२२ मध्ये माझे शारीरिक त्रास पुष्कळ वाढले होते. मी पोटदुखी आणि डोकेदुखी सहन करू शकत नव्हतो.
माझ्या यकृताचा आकार वाढला होता. आधुनिक वैद्यांनी त्याचे निदान ‘ती सौम्य यकृतवाढ (Mild hepatomegaly) आहे’, असे केले होते.
४. शारीरिक त्रासांत काळजी घेणारे कुणी नसतांना ‘गुरुदेवच चैतन्य देत आहेत’, असे जाणवणे
ते ऐकून प्रथम मला ताण आला आणि मी पुष्कळ घाबरलो. माझी काळजी घेणारे तेथे कुणीच नव्हते. माझ्यापुढे ‘या आजारपणात मी स्वतःला कसे सांभाळणार ?’, असा प्रश्न होता. त्या ७ ते १० दिवसांच्या कालावधीत केवळ गुरुदेवांनीच मला सांभाळले. मला प्रतिदिन ६ – ७ प्रकारच्या गोळ्या खाव्या लागत होत्या; परंतु मला त्याचा काहीच त्रास झाला नाही. ‘त्या स्थितीत गुरुदेवच चैतन्य देत आहेत’, असे मला जाणवले.’
– श्री. विनायक दिलीप मिठारे (वय १९ वर्षे), विशाखापट्टणम्, आंध्रप्रदेश. (२.११.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक