दक्षिण चीन समुद्रावर चीनच्या लढाऊ विमानांनी अमेरिकेच्या नौदलाच्या विमानाला रोखले !

नवी देहली – दक्षिण चीन समुद्रावर चिनी विमानांनी अमेरिकेच्या विमानांचा मार्ग अडवला. अमेरिकेच्या नौदलाचे टोही जेट विमान २१ सहस्र ५०० फूट उंचीवर उडत होते. हे विमान पॅरासेल बेटांपासून ३० मैलांवर होते. यातील सर्वांत मोठ्या बेटावर चीनचे सैन्यतळ आहे. यामुळे चीनच्या सैन्य तळावरून अमेरिकेच्या नौदलाच्या बिनतारी संदेशवाहनावर सांगण्यात आले, ‘अमेरिकेचे विमान, चिनी हवाई क्षेत्रापासून १२ नॉटिकल मैलांवर आहे. त्यामुळे आता पुढे येण्याची दायित्व तुमचे असेल.’

यानंतर काही मिनिटांतच हवेतून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या चिनी लढाऊ विमानाने अमेरिकी विमानाला रोखले. यानंतर अमेरिकेच्या विमानाने तेथून माघार घेतली.