धुळ्याजवळ मुंबई-आग्रा मार्गावर १६ तलवारींसह १० जणांना अटक
धुळे – पोलिसांनी येथून १६ तलवारी बाळगणार्या १० जणांना अटक केली अाहे. मुंबई-आग्रा मार्गावरील हदखेड नाक्यावर या टोळीला अटक करण्यात आली. राजस्थानमधून या तलवारी महाराष्ट्रात आणल्या गेल्याचे समजते. एका खोक्यात या तलवारी होत्या. गेल्या काही दिवसांत येथे शस्त्रे मिळण्याच्या घटना घडत आहेत. धुळे, जळगाव, नांदेड हा परिसर संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो. येथे ही घटना परत घडल्याने तिचे गांभीर्य वाढले आहे.
संपादकीय भूमिकाअशा तलवारींचा पुरवठा कुणाला होत आहे, याचे सरकारने गांभीर्याने अन्वेषण करणे आवश्यक ! |