‘श्री गुरूंचे चरण’ ही जगातील सर्वांत सुरक्षित जागा !
‘सध्या आपत्काळामध्ये तरून जाण्याच्या दृष्टीने आपण सर्व जण प्रयत्न करत आहोत. आपण विविध ठिकाणी सुरक्षित जागा बघत आहोत, तसेच सौर ऊर्जा आणि विविध वस्तू यांची सिद्धता करत आहोत. हे सर्व करत असतांना माझ्या मनात विचार आला, ‘ही सिद्धता आपण आज्ञापालन म्हणून करायचीच आहे. त्याच समवेत हेही लक्षात घ्यायला हवे, ‘जगात सुरक्षित जागा केवळ एकच आहे आणि ती म्हणजे ‘श्री गुरूंचे चरण’ ! काहीही झाले, तरी हृदयातून श्री गुरूंचे चरण सुटू द्यायचे नाहीत. त्यांना हृदयात घट्ट साठवून ठेवायचे. मग जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो, तरी सुरक्षितच राहू. ही सुरक्षितता केवळ स्थूल देहापुरती नसून सूक्ष्मातीसूक्ष्म देहांच्या संदर्भातही आहे.’
– श्री. नीलेश सुधाकर पाध्ये, ढवळी, फोंडा, गोवा (२.८.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |