रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे) हिला स्वप्नात दिसलेले दृश्य !
‘१४.५.२०२१ या दिवशी पहाटे मला एक स्वप्न पडले.
१. स्वप्नात दिसलेले दृश्य
१ अ. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गुरुदेव २ साध्वींना मार्गदर्शन करत असणे आणि परात्पर गुरुदेवांना तिथे पाहून साधिका आश्चर्यचकित होणे : मला स्वप्नात दिसले, ‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात फिरत आहे. मी पहिल्या माळ्यावर आले. तिथे गुरुदेव २ साध्वींना मार्गदर्शन करत आहेत. त्या वेळी गुरुदेवांनी पिवळा सदरा परिधान केला आहे. मी परात्पर गुरुदेवांना तिथे पाहून आश्चर्यचकित झाले. मी गुरुदेवांना भावपूर्ण नमस्कार केला आणि त्यांनी माझ्याकडे पाहून स्मितहास्य केले.
१ आ. ध्यानमंदिराच्या मार्गिकेत तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांना त्रास होतांना दिसणे आणि त्यांच्या समोरच परात्पर गुरुदेव त्या साध्वींना मार्गदर्शन करत असल्याचे पाहून साधिका निश्चिंत होणे : मी त्याच आनंदात स्वागतकक्षाच्या दिशेने जाऊ लागले. त्या वेळी पहिल्या माळ्यावर ध्यानमंदिराच्या मार्गिकेत तीव्र आध्यात्मिक त्रास असणारे साधक होते. त्यांना पुष्कळ त्रास होत होता. ‘त्यांच्या समोरच परात्पर गुरुदेव त्या साध्वींना मार्गदर्शन करत आहेत’, हे पाहून मी निश्चिंत झाले आणि आनंदाने स्वागतकक्षात गेले.
१ इ. स्वागतकक्षात मुख्य द्वारासमोर ‘एक महाराज झोपले आहेत’, असे दिसणे; मात्र ‘ते झोपले नसून त्यांनी देहत्याग केला आहे’, असे वाटणे, ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेपुढे परात्पर गुरुदेव उभे आहेत’, असे दिसणे अन् त्या वेळी तेथेही परात्पर गुरुदेवांना पाहून साधिका आश्चर्यचकित होणे : मी स्वागतकक्षात गेल्यावर मला ‘मुख्य द्वारासमोर एक महाराज झोपले आहेत’, असे दिसले. त्यांनी पांढर्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते. ‘ते झोपले नसून त्यांनी देहत्याग केला आहे’, असे मला वाटले. मी माझ्या डाव्या बाजूला पाहिले. त्या वेळी मला प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेपुढे परात्पर गुरुदेव दिसले. ते आसंदीवर बसले होते. त्यांनी पांढरा सदरा परिधान केला होता आणि ते ध्यानावस्थेत होते. मी गुरुदेवांना स्वागतकक्षात पाहून आश्चर्यचकित झाले. मला काही कळेच ना. काही वेळापूर्वी ते मला साध्वींना मार्गदर्शन करतांना दिसले होते. ‘आता ते इथे कसे काय ?’, हा प्रश्न माझ्या मनात आला. ‘ते महाराज कोण होते ?’, हेही मला कळले नाही.
२. कुटुंबियांना स्वप्नाविषयी सांगणे
२ अ. साधिका कुटुंबियांना स्वप्नाविषयी सांगत असतांना आदल्या दिवशी प.पू. भास्कर महाराज यांनी देहत्याग केल्याचे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आल्याचे तिच्या आजोबांच्या लक्षात येणे : यानंतर मला जाग आली. मी हे स्वप्न आईला (सौ. दीपा औंधकर यांना) आणि आजी-आजोबांना (आईचे आई-वडील सौ. सुजाता आणि श्री. अशोक रेणके यांना) सांगितले. मी त्यांना महाराजांचे वर्णनही सांगितले. त्या वेळी आजोबांच्या लक्षात आले, ‘ते प.पू भास्कर महाराज हाेते. आदल्या दिवशी वडाळा महादेव (नगर) येथील गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे उत्तराधिकारी प.पू. भास्कर महाराज यांनी देहत्याग केला होता, असे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आले होते. मला त्याविषयी ठाऊक नव्हते. मी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन केले. त्या वेळी मला जसे स्वप्नात दिसले होते, अगदी तसेच महाराज, म्हणजे प.पू. भास्कर महाराज दिसले होते.
२ आ. मला वाटले, ‘गुरुदेव मला एकाच वेळी २ ठिकाणी का दिसले असावेत ?’ त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘गुरुदेव सर्वत्र आहेत.’
२ इ. त्यानंतर माझ्या मनात ‘ते त्रास असणारे साधक कोण होते ?’, असा विचार आला. त्या वेळी माझ्या आजोबांनी मला सांगितले, ‘‘आपले काही साधक आध्यात्मिक स्तरावरील चैतन्य घेण्यासाठी प.पू. भास्कर महाराज यांच्याकडे जात असत. ते साधक तेच असू शकतात.’’
३. प्रार्थना आणि कृतज्ञता
गुरुदेव आपल्या समवेत आता या क्षणीही आहेत. ते किती महान आहेत ! आपल्याला ते या जन्मी गुरु म्हणून लाभले. आपल्यासाठी ते एक वरदान आहे.
‘गुरुदेवा, या प्रसंगामुळे माझी तुमच्यावर असलेली श्रद्धा वृद्धींगत झाली. माझी तुमच्यावरील श्रद्धा आणखी वृद्धींगत होऊ दे आणि मला तुमच्या चरणी विलीन होता येऊ दे. आमची तेवढी पात्रता नाही; पण आम्हाला तुम्हाला निर्गुणातून अनुभवता येऊ दे’, अशी तुमच्या कोमल चरणी प्रार्थना आहे. या प्रसंगातून परात्पर गुरुदेवांनी मला निर्गुण स्तरावरील अनुभूती दिली. त्याबद्दल मी त्यांच्या कोमल चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे), फोंडा, गोवा. (१६.५.२०२१)
‘सनातन प्रभात’मध्ये सनातनची दैवी बालके, बालसंत आणि संत यांच्या प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्या !‘सनातन प्रभात’मध्ये सनातनची दैवी बालके, बालसंत आणि संत यांची छायाचित्रे प्रसिद्ध होतात. प्रसिद्ध झालेल्या त्या छायाचित्रांकडे पाहून साधकांना ‘नामजप चालू होणे, भाव जागृत होणे, चैतन्य जाणवणे, प्रकाश जाणवणे, थंडावा जाणवणे, मन निर्विचार होणे, शांत वाटणे’, यांच्यापैकी काही अनुभूती आल्यास त्यांनी ‘सनातन प्रभात’चा तो अंक स्वतःकडे संग्रही ठेवावा. साधकांनी अनुभूती आलेल्या त्या छायाचित्राकडे बघून नामजप करावा. अशा प्रकारे साधकांनी ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या दैवी बालके, बालसंत आणि संत यांच्या छायाचित्रांचा आध्यात्मिक उपायांसाठी लाभ करून घ्यावा.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले |
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |