अन्नपूर्णामातेची क्षमायाचना केल्यावर आश्रमातील महाप्रसाद ग्रहण करता येणे
१. त्रासामुळे आश्रमात महाप्रसाद ग्रहण करता न आल्याने थकवा येणे आणि प्राणशक्ती अल्प होणे
‘मी देवद आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतांना आरंभी मला आध्यात्मिक त्रासामुळे आश्रमातील महाप्रसाद ग्रहण करता येत नव्हता. त्यामुळे मला पुष्कळ थकवा येत असे.
२. ‘आई आणि बहीण यांनी बनवलेल्या पदार्थांना नावे ठेवल्याने पाप लागले’, हे लक्षात येणे आणि त्याविषयी पू. (सौ.) अश्विनी पवार यांना सांगणे
‘अन्नाचा अपमान केल्याने कोणते पाप भोगावे लागते ?’, याविषयी एकदा ‘व्हॉट्स ॲप’वरील एक लेख (‘पोस्ट’) माझ्या वाचनात आला. तो लेख वाचल्यावर मी पू. (सौ.) अश्विनीताईंना म्हणालो, ‘‘माझ्याकडून आई आणि बहीण यांनी बनवलेल्या पदार्थांना नावे ठेवणे आणि अन्नाचा अपमान करणे’, असे घडले आहे. मी या पापाचे क्षालन कसे करू ?’’
३. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी संबंधित व्यक्तींची अन् अन्नपूर्णामातेच्या चरणी क्षमायाचना करण्यास सांगणे
त्या वेळी पू. अश्विनीताई मला म्हणाल्या, ‘‘प्रसाद आणि महाप्रसाद ग्रहण करण्यापूर्वी संबंधित व्यक्तींची आणि अन्नपूर्णामातेच्या चरणी क्षमायाचना करून महाप्रसाद ग्रहण करत जा.’’ तेव्हापासून मी अन्नपूर्णामातेच्या चरणी क्षमायाचना करू लागलो. तेव्हा पू. अश्विनीताईंचे मला अन्नपूर्णामातेच्या रूपात नियमित दर्शन होत असे. ‘त्या माझ्याकडे वात्सल्यभावाने पहात स्मितहास्य करत आहेत’, असे जाणवायचे.
मी क्षमायाचना नियमित करू लागल्यावर माझा त्रास दूर होऊन मला महाप्रसाद पोटभर ग्रहण करता येऊ लागला.’
– श्री. अमित हावळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१०.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |