रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पहातांना मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !
१. श्री. सुनील भंडिवाड (बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे यांचे शिष्य), पुणे
अ. ‘आश्रमाची रचना आणि व्यवस्थापन उत्कृष्ट आहे. येथील सर्व साधकांच्या चेहर्यावर आनंद आणि शांती दिसते. आश्रमात चालू असलेले संशोधनकार्य आश्चर्यकारक आहे.
आ. आश्रमात सर्वत्र चैतन्य जाणवते. त्याचा लाभ मला माझ्या साधनेसाठी निश्चितपणे होईल. आश्रम पहाण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.’
२. श्री. अजित पद्मनाभ, (संस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक डब्लू.एच्.ओ. व्ही.आर्. (Founder & CEO WHO VR.), बेंगळुरू, कर्नाटक.
अ. ‘आश्रम पहातांना मला आलेल्या अनुभवांचे वर्णन मी शब्दांत करू शकत नाही. येथील प्रत्येक व्यक्तीची झालेली भेट अतुलनीय, आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय होती. आश्रमातील कार्य परमात्म्याच्या नेतृत्वाखाली चालू झाले असून त्याच परमात्म्याद्वारे ते पुढेही चालवले जाणार आहे.’
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमी यांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |