रामनाथी आश्रमात झालेल्या युवा शिबिराच्या वेळी सिंधुदुर्ग येथील कु. राखी पांगम यांना आलेल्या अनुभूती
१. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी आलेली अनुभूती
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी मला त्यांच्याभोवती प्रकाशाचे वलय दिसले आणि त्यांनी प्रार्थना केल्यानंतर प्रकाशात वाढ झाल्याचे जाणवले.
२. चित्रे आणि छायाचित्रे यांच्या प्रयोगाच्या वेळी जाणवलेली सूत्रे
आम्हाला श्रीकृष्ण आणि शिव यांची चित्रे अन् प.पू. भक्तराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची छायाचित्रे दाखवण्यात आली. ती पाहून मला पुढील सूत्रे जाणवली.
अ. मला श्रीकृष्णाच्या चित्रामध्ये जिवंतपणा जाणवला. ‘चित्रातील श्रीकृष्णाचे दागिने आणि वस्त्रे खरी आहेत. श्रीकृष्णाचे डोळे चमकत आहेत’, असे मला जाणवले.
आ. चित्रातील भगवान शंकराच्या डमरूजवळ सूक्ष्मातून फुलपाखरू बसल्याचे मला दिसले.
इ. प.पू. भक्तराज महाराज यांचा चेहरा आणि हात अधिक पिवळसर झाल्याचे मला दिसले.
ई. ‘छायाचित्रातील परात्पर गुरु डॉक्टरांचा सदरा गुलाबी रंगाचा झाला आहे’, असे मला जाणवले.
३. संतांचे दर्शन झाल्यावर आलेल्या अनुभूती
अ. माझ्या दोन्ही तळहातांना गारवा जाणवला.
आ. माझ्या दोन्ही हातांची नखे अधिक गुलाबी झाल्याचे माझ्या लक्षात आले.’
– कु. राखी गणेश पांगम, सिंधुदुर्ग (१७.११.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |