सातारा जिल्ह्यात एका रात्रीत ४ घरफोड्या !
सातारा, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – सध्या सातारा जिल्ह्यात दरोडेखोरांनी घरफोड्यांचे सत्र चालू केले असून २३ फेब्रुवारीच्या रात्री जिल्ह्यात ४ ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. खटाव तालुक्यातील ललगुण आणि डिस्कळ, तर सातारा तालुक्यातील निगडी आणि तामजाईनगर, शाहूपुरी येथे या घरफोड्या झाल्या आहेत.
मध्यरात्री झालेल्या या घरफोड्यांमध्ये अज्ञात चोरांनी रोख रक्कम, भ्रमणभाष आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरले आहेत. जिल्ह्यातील सातारा तालुका पोलीस ठाणे आणि पुसेगाव पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या आहेत.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह ?सातारा पोलीस दलाचा संपूर्ण महाराष्ट्रभर चांगला दबदबा आहे; मात्र सतत गोळीबाराच्या घटना, घरफोडीच्या घटना, कोयता गँग, चड्डी-बनियन गँग यांची दहशत यांमुळे सातारा पोलीस दलाचा गुन्हेगारांवरील दबदबा पुन्हा अल्प झाला कि काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सातारा पोलिसांनी समाजोपयोगी उपक्रमांसमवेत गुन्हेगारांवर वचक कसा राहील ? याचेही आत्मपरीक्षण केले पाहिजे. अन्यथा समाज पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याविना रहाणार नाही, असे तज्ञांचे मत आहे. |
संपादकीय भूमिकासाध्या चोरांना पकडू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांशी हिंमतीने लढा कसा देणार ? |