ऑस्ट्रेलियात खलिस्तानवाद्यांनी भारतीय वाणिज्य दूतावासावर फडकवला खलिस्तानी झेंडा !
ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियात खलिस्तानवाद्यांकडून मंदिरांनंतर आता ब्रिस्बेनमधील टारिंगा उपनगरातील स्वान रोड येथे असलेल्या भारतीय वाणिज्य दूतावासावर खलिस्तानी झेंडा फडकवण्यात आला. खलिस्तानवाद्यांनी या दूतावासावर आक्रमण केल्याचेही सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच खलिस्तानवाद्यांनी ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा येथील मंदिरांत तोडफोड केल्याच्या घटना घडल्या होत्या.
विदेश मंत्री एस. जयशंकर (#SJaishankar) की ऑस्ट्रेलिया यात्रा के कुछ दिनों बाद, हिंदू मंदिरों में तोड़फोड़ की गई और ब्रिसबेन में भारतीय वाणिज्य दूतावास के पास खालिस्तानी झंडा (#Khalistani) दिखा। pic.twitter.com/dw2JdWtaeB
— IANS Hindi (@IANSKhabar) February 24, 2023
ब्रिस्बेन येथील भारताच्या वाणिज्यदूत अर्चना सिंह यांना २२ फेबु्रवारीला कार्यालयात खलिस्तानी झेंडा फडकवलेला दिसून आला. यानंतर त्यांनी त्वरित क्वींसलँड पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी येऊन झेंडा जप्त केला. या घटनेविषयी अर्चना सिंह म्हणाल्या, ‘‘खलिस्तानी उद्देशासाठी हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य करण्याच्या कृतीमुळे मी किती व्यथित आहे, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही.’’
संपादकीय भूमिकाअशाने भारताची जगभर नाचक्की होत आहे, हे लक्षात घेऊन सरकारने खलिस्तानी प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी कठोर पावले तात्काळ उचलली पाहिजेत ! |