(म्हणे) ‘मोगल येथे लुटायला नव्हे, तर घर बनवण्यासाठी आले होते !’ – नसिरुद्दीन शहा
अकबराची भूमिका साकारणारे नसिरुद्दीन शहा यांचे नवे इतिहासद्रोही विधान !
मुंबई – ‘मोगल केवळ वाईटच होते’, असा विचार करणे देशाच्या इतिहासाची कमतरता दर्शवते. आपल्या इतिहासाच्या पुस्तकात भारताच्या स्वदेशी संस्कृतीपेक्षा मोगलांचा जास्त गौरव करण्यात आला असेलही; परंतु इतिहासातील त्यांचा काळ विनाशकारी म्हणून दाखवला जाऊ नये. त्यांना खलनायक बनवण्याची आवश्यकता नाही. मोगल इथे लुटायला आले नव्हते. या देशाला आपले घर बनवण्यासाठी ते येथे आले आणि त्यांनी तेच केले. त्यांचे योगदान कोण नाकारू शकेल ?, असे इतिहासद्रोही विधान अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी केले आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोगलांच्या इतिहासाविषयी आक्षेपार्ह टिपण्या केल्या आहेत. ‘या देशामध्ये मोगलांविषयी फार चांगले मत नाही. त्याकडे तुम्ही कसे पाहता ?’, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देतांना त्यांनी वरील विधान केले.
Naseeruddin Shah says Mughals’ contribution to India can’t be denied: ‘They didn’t come here to loot’https://t.co/uHAoqH9Jcd
— HT Entertainment (@htshowbiz) February 24, 2023
शाह यांनी ‘ताज – डिव्हाइडेड बाय ब्लड’ या ‘झी ५’ वाहिनीवरील ‘वेब सिरिज’मध्ये अकबराची भूमिका साकारली आहे. या मालिकेच्या प्रमोशनच्या (प्रसाराच्या) कार्यक्रमात ‘मोगलांचा अवमान करू नये’, असे मोगलप्रेमी विधान केले होते. ही मालिका अककबर आणि अन्य मोगल राजे यांच्यावर आधारित आहे.
या मुलाखतीत शहा यांनी पुढे म्हटले आहे, ‘‘जर मोगल साम्राज्य इतके वाईट होते, तर त्याला विरोध करणारे त्यांनी बांधलेली स्मारके का पाडत नाहीत ? त्यांनी जे काही केले, ते वाईट असेल, तर ताजमहाल पाडा, लाल किल्ला पाडा, कुतुबमिनार पाडा. लाल किल्ल्याला आपण पवित्र का मानतो ? तो मोगलांनी बांधला होता. (शाह यांनी ऐतिहासिक संदर्भ पडताळून पहावेत. लाल किल्ला हा हिंदु राजांनी बांधला होता आणि ताज महाल हे शिवालय होते. त्यामुळे त्यांना ‘मोगलांनी बांधलेल्या वास्तू’ म्हणणे, हे हास्यास्पद होय ! – संपादक) आपल्याला त्याचा गौरव करण्याची आवश्यकता नाही; परंतु आपल्याला त्याची अपकीर्ती करण्याचीही आवश्यकता नाही.’’
संपादकीय भूमिका
|