रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !
‘सनातन धर्म शिकवण्यासाठी संस्थेद्वारे अत्याधुनिक पद्धतींचा उपयोग केला जात आहे’, हे पाहून पुष्कळ चांगले वाटले. माहितीजालाच्या (इंटरनेटच्या) काळात सनातन धर्माचा प्रसार अधिकाधिक लोकांपर्यंत करता येऊ शकतो. बहुतांश हिंदूंनाच आपल्या सनातन धर्माची पूर्ण माहिती नाही. त्यांना ती माहिती देण्याचे कार्य सनातन संस्था करत आहे. हे कार्य त्वरित करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा भारतीय संस्कृती समाप्त होईल.’
– श्री. डी.पी. गुप्ता, देहली