सप्तर्षींच्या आज्ञेनुसार साधकांनी भ्रमणभाषवर बोलतांना ‘नमस्कार’ ऐवजी ‘हरि ॐ’ असे म्हणून संभाषण चालू करावे !
सर्व साधकांसाठी महत्त्वाची सूचना
‘भ्रमणभाषवरून बोलतांना साधक ‘नमस्कार’ या शब्दाने संभाषणाला आरंभ करतात. यापुढे सप्तर्षींच्या आज्ञेनुसार भ्रमणभाषवरून बोलतांना सर्व साधकांनी ‘हरि ॐ’ असे म्हणून आपापसांतील बोलणे चालू करावे. साधकांना प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांच्याशी बोलतांना मात्र ‘नमस्कार’ असेच म्हणावे. प.पू. भक्तराज महाराज ‘हरि ॐ तत्सत्’ हा जप करत असत. ‘हरि ॐ’ असे म्हटल्याने सर्व साधकांना प.पू. भक्तराज महाराज यांचे स्मरण होईल, तसेच त्यांचा आशीर्वाद आणि चैतन्यही मिळेल.
वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना प्रत्यक्ष भेटल्यावर, तसेच त्यांच्याशी भ्रमणभाषवरून बोलतांना नेहमीप्रमाणे ‘नमस्कार’ असे म्हणून संभाषणाला आरंभ करावा.’
– (श्रीसत्शक्ति) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.३.२०२०)