संजय राऊत यांच्या विरोधात ठाणे येथे गुन्हा नोंद
ठाणे, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपारी दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात तक्रारी प्रविष्ट होण्यास आरंभ झाला.
ठाणे, नाशिक पाठोपाठ पुन्हा ठाणे शहरातील कापूरबावडी पोलीस ठाणे येथे संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना ठाणे शहर महिला संघटक आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी गुन्हा नोंद केला आहे. राऊत यांच्या विरोधात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मनोरुग्णालयाबाहेर आंदोलन केले.