उदयपूर (राजस्थान) येथे भगवान परशुरामाच्या मूर्तीची तोडफोड !
|
उदयपूर (राजस्थान) – येथील रावलिया खुर्द या गावात २० फेबु्रवारी या दिवशी येथील एका मंदिरात भगवान परशुरामाच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली.
भगवान परशुरामाची मूर्ती असलेल्या या मंदिरात ग्रामस्थ नित्य येऊन पूजा-अर्चा करत होते. २० फेबु्रवारी या दिवशी ग्रामस्थ नेहमीप्रमाणे मंदिरात आले असता त्यांना भगवान परशुरामाच्या मूर्तीचे दोन्ही हात तोडलेले, तर पाय तोडून ते जवळील जिन्याजवळ फेकलेले दिसले. गावात ही बातमी वार्यासारखी पसरल्यानंतर हिंदू तात्काळ मंदिराजवळ जमा झाले. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी हिंदूंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तथापि संतप्त झालेल्या हिंदूंनी प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यानंतर या प्रकरणी पोलिसांनी प्रथम खबरी अहवाल (एफ्.आय.आर्.) प्रविष्ट करून आरोपींचा शोध चालू केला आहे. तथापि पोलीस ३ दिवसांनंतरही (२३ फेबु्रवारीपर्यंतही) आरोपींना शोधू शकलेले नाहीत.
राजस्थान में तोड़ी गयी परशुराम जी की मूर्ति।
मामला राजस्थान के उदयपुर का। pic.twitter.com/NHDBtlNtLb
— Panchjanya (@epanchjanya) February 22, 2023
राजस्थानमधील परिस्थिती इराक आणि सीरिया यांच्यापेक्षाही खराब ! – भाजप
या घटनेविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजपचे खासदार अर्जुन लाल मीणा म्हणाले, ‘‘काँग्रेसशासित राजस्थामधील परिस्थिती ही इराक आणि सिरीया येथील स्थितीपेक्षाही खराब आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत अवलंबलेल्या लांगूलचालनाच्या धोरणामुळे राजस्थानात हिंदूंना रहाणे कठीण होत चालले आहे. समाजकंटकांवर कठोरात कठोर कारवाई करावी. |
मन्दिरों पर बुलडोजर
पुजारियों की हत्या
और अब मूर्तियों को तोड़नाकल परशुराम की मूर्ति तोड़ी गयी तो आज हनुमान जी की
यह है कांग्रेस के कुशासन में राजस्थान का हाल pic.twitter.com/sO33rKB6ro— BJP Rajasthan (@BJP4Rajasthan) February 22, 2023
संपादकीय भूमिका
|