‘जिहादी वधू’ शमीमा बेगम हिला नागरिकत्व देण्यास ब्रिटनचा नकार !
इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याशी विवाह केल्याचे प्रकरण
लंडन – इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याशी विवाह केल्यामुळे ‘जिहादी वधू’ म्हणून ओळखली जाणारी शमीमा बेगम हिला नागरिकत्व देण्यास ब्रिटनने नकार दिला आहे. वर्ष २०१५ मध्ये इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्यासाठी ती ब्रिटनमधून सीरियाला गेली होती. सीरियामध्ये इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी जगभरातील मुसलमान युवतींना ‘सीरियात येऊन इस्लामिक स्टेटच्या जिहादी आतंकवाद्यांशी विवाह करा’, असे आवाहन केले होते. यानंतर अनेक देशांतील धर्मांध युवतींनी सीरियाला पलायन केले होते. शमीमा बेगम ही त्यांतीलच एक होती.
ISIS आतंकी की ब्रिटिश दुल्हन को अदालत से झटका, नहीं मिला ब्रिटेन का रिटर्न टिकट; 5 प्वाइंट में जानें सबकुछ#ISISBride #shamimabegum #terrorist https://t.co/bqUDejdO7D
— Dainik Jagran (@JagranNews) February 23, 2023
१. शमीमाने सीरियाला पलायन केल्यानंतर तिचे ब्रिटीश नागरिकत्व काढून घेण्यात आले होते. या विरोधात शमीमा हिने ब्रिटीश न्यायालयात खटला प्रविष्ट केला होता.
२. ‘शमीमाचे ब्रिटीश नागरिकत्व काढून घेण्याचा गृहखात्याचा निर्णय योग्य असून त्याला स्थगिती दिली जाणार नाही’, असे ब्रिटनमधील न्यायालयाने सांगितले.
३. सीरियात इस्लामिक स्टेटला उतरती कळा लागल्यानंतर सध्या शमीमा ही सीरियातील निर्वासित छावणीमध्ये रहात आहे. तिला २ मुले आहेत. तिने अनेकदा ब्रिटीश सरकारची क्षमा मागत ब्रिटीश नागरित्व देण्याची मागणी केली होती; मात्र ब्रिटीश सरकारने तिची मागणी वारंवार फेटाळली आहे.
संपादकीय भूमिकाआतंकवाद्याशी विवाह करणार्या युवतीच्या विरोधात कठोर धोरण अवलंबणार्या ब्रिटनकडून भारताने बोध घ्यावा ! |