पोलीस अधिकार्याच्या पिस्तुलातून झालेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक गंभीर घायाळ !
मोक्का प्रकरणातील फरार आरोपीला पकडण्याचे प्रकरण
कळमनुरी (जिल्हा हिंगोली) – येथील इंदिरानगर भागात मोक्का प्रकरणातील फरार आरोपीला पकडतांना झालेल्या झटापटीत पोलीस अधिकार्याच्या पिस्तुलातून गोळीबार झाला. यात पोलीस उपनिरीक्षक शेख माजीद गंभीर घायाळ झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. पोलीस आरोपी बबलूसिंग टाक याच्या शोधात होते. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. त्याचा पाठलाग करून त्याला पकडतांना वरील प्रकार घडला.
बबलूसिंग याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला जाईल. तसेच या संपूर्ण प्रकरणाची उपाधीक्षकांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येणार आहे.