नांदेड पोलीस दलातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांचे स्थानांतर रहित !
नांदेड पोलीस दलाच्या इतिहासातील पहिलीच घटना !
नांदेड – नांदेड पोलीस दलात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांचे स्थानांतर रहित झाले. त्यांनी स्वतःच्या अन्यायकारक स्थानांतराला न्यायाधिकरण (मॅट) मध्ये दाद मागितली होती. तिला त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे एखादा अन्यायग्रस्त अधिकार्याने मॅटमध्ये जाऊन पुन्हा तीच खुर्ची मिळवणे, ही नांदेड पोलीस दलाच्या इतिहासातील पहिलीच घटना मानली जात आहे.
१. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी जिल्ह्यातील एकूण ८५ पोलीस अधिकार्यांचे स्थानांतर केले होते. यामध्ये गुन्हे शाखेचे प्रमुख द्वारकादास चिखलीकर यांचे ग्रामीण ठाणेदार म्हणून स्थानांतर झाले होते.
२. चिखलीकर यांच्या सेवानिवृत्तीला केवळ ७ मास बाकी आहेत. त्यामुळे स्थानांतर अधिनियम २००५ आणि २०१८ च्या शासन परिपत्रकानुसार त्यांचे स्थानांतर इतरत्र करता येत नाही किंवा त्यांच्या इच्छेविना स्थानांतर करू नये, असे बंधनकारक आहे; मात्र स्थानांतरामुळे ‘मॅट’मध्ये धाव घेतली होती.