नवी मुंबईत साहाय्यक आयुक्त यांच्यासह अन्य अधिकार्यांचे स्थानांतर !
नवी मुंबई, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने साहाय्यक आयुक्त आणि प्रशासकीय अधिकारी यांचे स्थानांतर केले आहे. साहाय्यक आयुक्त संजय तायडे यांची समाज विकास विभागातून घणसोली विभाग कार्यालय, शशिकांत तांडेल मालमत्ता विभागातून यांचे बेलापूर विभाग अधिकारी, शंकर खाडे यांचे घणसोली विभागातून दिघा विभाग, चंद्रकांत तायडे यांचे भांडार विभागातून परवाना विभागात, बेलापूर विभागाच्या साहाय्यक आयुक्त मिताली संचेती यांचे भांडार विभाग आणि मालमत्ता विभाग कार्यभार, मनोहर गांगुर्डे यांचे दिघा विभाग कार्यालयातून नेरूळ विभाग कार्यालयात सहाय्यक आयुक्त म्हणून स्थानांतर केले आहेे.
प्रशासकीय अधिकारी सुनील पाटील यांचे नेरूळ विभाग कार्यालय ते कोपरखैरणे विभाग कार्यालय येथे स्थानांतर करण्यात आले आहे. तुर्भे विभागाचे उपअभियंता प्रशांत पिंपळे यांचे घणसोली विभागात, तर घणसोली विभागाचे उपअभियंता विश्वकांत लोकरे यांचे तुर्भे विभागात स्थानांतर करण्यात आले आहे.
या कर्मचार्यांना स्थानांतराच्या ठिकाणी तात्काळ उपस्थित होणे बंधनकारक आहे. कर्मचार्यांनी अनधिकृत सुट्टीवर जाऊ नये, अन्यथा त्यांची अनुपस्थिती ही अनधिकृत अनुपस्थिती समजण्यात येऊन विनावेतन आणि विनाभत्ते करण्यात येईल. तसेच त्यांच्यावर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी या आदेशात म्हटले आहे.