‘आयुर्वेदिक रिटेलर्स असोसिएशन’च्या वतीने पंचमहाभूत लोकोत्सवासाठी १०० किलो तूरडाळ !
कोल्हापूर, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘आयुर्वेदिक रिटेलर्स असोसिएशन’ (ए.आर्.ए. महाराष्ट्र) शाखा कोल्हापूर यांच्या वतीने पंचमहाभूत लोकोत्सवासाठी १०० किलो तूरडाळ अर्पण देण्यात आली. या वेळेस सर्वश्री अभिजित डुबल, आदिनाथ घोंगडे, सागर जाधव, अचल हांजे, शशिकांत कुलकर्णी, नितीन शहा, राजीव चौगुले उपस्थित होते.