‘साधकाने ईश्वराचा ‘प्रीती’ हा गुण आत्मसात होण्यासाठी काय करावे ?’, याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘एकदा एका सत्संगात एका साधिकेने परात्पर गुरु डॉक्टरांना पुढील प्रश्न विचारला, ‘‘तुम्ही सर्वांवर निरपेक्ष प्रेम करता. मला तसे जमत नाही. साधक कसा आहे ? त्याचे वय आणि प्रकृती पाहून माझे वागणे पालटत असते. त्यामुळे माझ्यात आपल्यासारखी ‘प्रीती’ नाही. हा गुण स्वतःत येण्यासाठी काय करायला हवे ?’’ परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘‘छान प्रश्न विचारला’’, असे म्हणून पुढील सूत्रे सांगितली.
१. ‘प्रत्येक साधकाची प्रकृती भिन्न आहे. त्यानुरूप तो वागत असतो’, हे समजून घ्यायचे.
२. ‘साधक साधनेसाठी सनातन संस्थेत आला आहे’, हे सूत्र स्वतःच्या मनावर बिंबवायचे.
३. साधकाकडून काही त्रुटी झाल्यास त्याची चूक सांगतांना ‘मला साधकाला साधनेत साहाय्य करायचे आहे’, असा विचार मनात असायला हवा.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.२.२०२२)