बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी सातारा जिल्हा पोलिसांकडून ‘उंच भरारी’ योजना उपक्रम !
सातारा, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – बाल गुन्हेगारी रोखून गुन्हेगार बनू पहाणार्या विधी संघर्ष बालक आणि युवकांना गुन्हेगारीपासून प्रवृत्त करणारा ‘उंच भरारी’ योजना उपक्रम जिल्हा पोलिसांनी हाती घेतला आहे. ही योजना १५ ते २५ वर्षे वयोगटासाठी राबवली जाणार आहे. यात १४९ युवक-युवतींना सहभागी करून घेण्यात आले असून ‘कौशल्य विकास योजने’च्या अंतर्गत त्यांना रोजगारही दिला जाईल. ही योजना कराड, सातारा, वाई, पाटण आणि फलटण येथे राबवली जाईल.