परभणी येथे प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र विद्यार्थ्यांना पाठवणार्या ६ शिक्षकांना अटक !
परभणी – इयत्ता बारावीचा इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणार्या ६ शिक्षकांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २१ फेब्रुवारीच्या रात्री या शिक्षकांना अटक करण्यात आली. कालिदास कुलकर्णी, बालाजी बुलबुले, गणेश जयतपाल, रमेश मारोती शिंदे, सिद्धार्थ सोनाळे आणि भास्कर तिरमले अशी अटक केलेल्या शिक्षकांची नावे आहेत. शिक्षकांनी प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र काढून ते व्हॉटस्ॲपवर अन्य विद्यार्थ्यांना पाठवले.