‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ यांविषयी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार !
मुंबई – निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह शिवसेनेच्या शिंदे गटाला दिले आहे. आयोगाच्या या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले होते. २२ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या सुनावणीमध्ये सर्वाेच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एक प्रकारे सर्वाेच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या अधिकाराला मान्यता दिली आहे.
सत्तासंघर्षावर सुनावणीच्या दुस-या दिवशी घमासान
उद्धव ठाकरेंना आणखी एक जबरदस्त झटका#UdhhavThackeray #Shivsena #EknathShinde #ShivSenaCrisis https://t.co/HLgw9Hypsy— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 22, 2023
या वेळी सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेला त्यांचे म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या वेळी ठाकरे गटाचे अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी ‘येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेकडून पक्षादेश काढल्यास ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरू शकतात’, असे मत व्यक्त करत पक्षादेश न काढण्याची मागणी केली. यावर न्यायालयाने २ आठवडे पक्षादेश न काढण्याचा आदेश शिवसेनेला दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ आठवड्यांनी होणार आहे.