कराड येथील कापड दुकानदारांची १ लाख २५ सहस्र रुपयांची ऑनलाईन फसवणूक !
कराड, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील बाजारपेठेतील कापड दुकानदारांची भाग्यनगर (हैद्राबाद) येथील युवकाने १ लाख २५ सहस्र रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कराड शहर पोलिसांनी शहेनशहा शरीफ शेख यांना अटक केली असून कापड व्यापारी अभिषेक जैन यांनी पोलिसात तक्रार प्रविष्ट केली होती.
शहरातील कापड बाजारपेठेत जैन यांच्याकडून शेख यांनी ७९ सहस्र रुपयांची खरेदी केली. ऑनलाईन पैसे देणार असल्याचे सांगत शेख यांनी ‘क्युआर् कोड स्कॅन’ करण्याचे नाटक करत पैसे पाठवल्याचा खोटा ‘स्क्रीनशॉट’ जैन यांना दाखवला; मात्र खात्यावर पैसे आले नसल्याचे जैन यांनी सांगितले, तेव्हा ‘सर्व्हर’ला अडचण असल्यामुळे असे झाले असेल’, असे शेख यांनी सांगितले. पुढे आणखी एका दुकानातून ३९ सहस्र आणि ४ सहस्र ५०० रुपयांची खरेदी करून त्यांचीही अशीच फसवणूक केली. (लोकसंख्येत अल्पसंख्य म्हणवणारे धर्मांध गुन्हेगारीत मात्र पुढे असतात. – संपादक) ही माहिती कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. नंतर शेख यांना सापळा रचून पोलिसांनी अटक केली.