दूध किंवा न्याहारी अंघोळीपूर्वी न घेता अंघोळ झाल्यावरच का घ्यावेत ?
‘अंघोळीपूर्वी पूर्वी काहीही खाऊ नये. जर अंघोळीपूर्वी अगदीच प्यायचे असल्यास अर्धा कप गरम पाणी अथवा अर्धा कप चहा घेण्यास आडकाठी नाही; पण अनेकांना सकाळी उठल्यावर अंघोळीपूर्वी खारी, बिस्कीट, टोस्ट, पाव इत्यादी चहामध्ये बुडवून खाणे, पेलाभर दूध पिणे किंवा पोहे, उपमा अथवा शिरा अशा प्रकारचा कोणताही पदार्थ न्याहरी (नाश्ता) म्हणून घेण्याची सवय असते. आयुर्वेदानुसार असे करणे वर्ज्य आहे.
(सौजन्य : वैद्य समीर मुकुंद परांजपे)
अंघोळ हे भूक, ऊर्जा आणि बळ यांमध्ये वृद्धी करते. अंघोळ केल्याने अग्नी वाढून कडकडून भूक लागते, तेव्हा न्याहारी करावी. त्यामुळे सर्वांनी लवकर उठून अंघोळ करावी आणि त्यानंतरच न्याहारी करावी. आयुर्वेदोक्त दिनचर्येचे पालन करून निरोगी रहावे !
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (२७.१२.२०२२)
(संपर्कासाठी ई-मेल : drsameerparanjape@gmail.com)