६ गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांच्या ठिकाणी उत्तरे प्रसिद्ध केली !
इयत्ता बारावीच्या ‘इंग्रजी’ विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील भोंगळ कारभार !
मुंबई – इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ६ गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांच्या ठिकाणी उत्तरेच प्रसिद्ध झाली आहेत. यंदा २१ फेब्रुवारीपासून इयत्ता १२ वी ची परीक्षा चालू झाली असून पहिला पेपर इंग्रजी भाषेचा होता.
आज इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ६ गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांऐवजी चक्क उत्तरेच छापून आली आहेत. दरवर्षी आढळून येणाऱ्या या चुकांमुळे इंग्रजी विषयाच्या कृतिपत्रिकेत गोंधळ होणे हे नित्याचेच झाले असल्याची चर्चा होऊ लागली आहे.https://t.co/KvzxnuWcDb
— LoksattaLive (@LoksattaLive) February 21, 2023
इंग्रजीत ८० गुणांची कृतीपत्रिका असते. त्यात प्रश्न क्रमांक ३ मध्ये १४ गुणांसाठी कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातात. या वेळच्या प्रश्नपत्रिकेत ३ प्रश्नांची उत्तरे जशीच्या तशी छापून आली आहेत.
बोर्डाने विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात सरसकट ६ गुण द्यावेत, अशी मागणी भंडारा येथील इंग्रजी विषयाचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक नदीम खान यांनी केली आहे.
संपादकीय भूमिका
|