खासदार श्रीकांत शिंदे यांनी मला मारण्याची सुपारी गुंडाला दिली !
खासदार संजय राऊत यांचा आरोप
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मला मारण्याची सुपारी ठाण्ो येथील एका गुंडाला दिली आहे, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याविषयीचे पत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई, तसेच ठाणे येथील पोलीस आयुक्तांना दिले आहे.
सौजन्य एबीपी माझा
या पत्रात म्हटले आहे की, जय महाराष्ट्र ! गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे आणि आक्रमणे करण्याचे प्रमाण वाढले आहेत. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली. माझी त्याविषयी तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे. गृहमंत्री म्हणून आपण त्याविषयी सक्षम आहात; पण तरीही एक गंभीर गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्ो येथील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला माझ्यावर आक्रमण करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे.