धुळे येथे शिवजयंती मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक !
संतप्त हिंदूंकडून पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा !
धुळे – येथे १९ फेब्रुवारीला सायंकाळी चाळीसगाव रोड युवक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. शिफा रुग्णालयाजवळ काही धर्मांधांनी मिरवणुकीवर विटा आणि दगड यांचा मारा केला. (हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेक व्हायला धुळे जिल्हा काय पाकिस्तानात आहे का ? केवळ हिंदूंनाच सर्वधर्मसमभावाचे धडे देणारे आता कोणत्या बिळात लपून बसले ? पोलीस प्रशासनाने अशा घटना घडूच नयेत, यासाठी प्रयत्न करायला हवेत. – संपादक) यात १७ महिला आणि पुरुष घायाळ झाले आहेत. या वेळी धर्मांधांकडून चिथावणीखोर घोषणाही देण्यात आल्या.
शिवजयंतीला गालबोट, भव्य शोभायात्रेत अचानक दगडांचा वर्षाव; मुलं-बायका जीव वाचून पळाले…https://t.co/D5TV86EMxr
— Maharashtra Times (@mataonline) February 20, 2023
श्री. विनायक कोठावदे (वय ५१ वर्षे) यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली. त्यानुसार अज्ञात व्यक्तींच्या विरोधात भा. दं. वि. ३३७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेतील दोषींवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी संतप्त हिंदूंनी २० फेब्रुवारीला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. तेथे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी महापौर, नगरसेवक, अनेक पक्षांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोषींच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल ! – किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक
मिरवणुकीवर दगडफेक करणारे आरोपी कोणत्या धर्माचे किंवा जातीचे आहेत, याचा विचार न करता कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी मोर्चेकर्यांना दिले.
हिंदूंनो, मुसलमानांचे ‘भूमी जिहाद’चे षड्यंत्र रोखा ! – अनुप अग्रवाल, भाजप महानगरप्रमुख, धुळे
या भागातील ७० टक्के हिंदूंनी त्यांची घरे मुसलमानांना विकली आहेत. आताही मिरवणुकीवर आक्रमण करून ते उर्वरित हिंदूंना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘असे केल्यास हिंदू तेथील घरे मुसलमानांना विकतील’, असे त्यांना वाटते. तरी या षड्यंत्राला हिंदूंनी बळी पडू नये. राजे छत्रपतींची मिरवणूक आपण काढायची. त्यावर धर्मांधांनी दगडफेक करायची आणि गुन्हे आपल्याच हिंदूंवर नोंद होतील, हे आता चालणार नाही. आम्ही ते कदापि होऊ देणार नाही. यापुढे ‘१०० फुटी’ रस्त्याजवळ असलेल्या महापालिकेच्या भूखंडावर धर्मांधांनी केलेले अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मोहीम राबवली जाईल, असे आश्वासन भाजपचे श्री. अनुप अग्रवाल यांनी मोर्चेकर्यांना दिले.
संपादकीय भूमिकाहिंदूंनो, वारंवार तुमच्या मिरवणुकांवर धर्मांधांकडून केली जाणारी आक्रमणे थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे, हे जाणा ! |