भाग्यनगर येथे भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
भाग्यनगर (तेलंगाणा) – येथे ३ भटक्या कुत्र्यांनी एका ४ वर्षांच्या मुलांवर आक्रमण केले. लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याचे वडील धावत आले आणि त्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून मुलाची सुटका केली. आक्रमणात गंभीररित्या घायाळ झाल्याने मुलाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या आक्रमणाचे सीसीटीव्ही चित्रण प्रसारित होत आहे. ३ दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशच्या बिलासपूर गावातही भटक्या कुत्र्यांनी कान्हा नावाच्या मुलावर आक्रमण केले होते. यात त्याचा मृत्यू झाला होता.
सड़क पर घूम रहे 4 साल के बच्चे पर टूट पड़े 3 कुत्ते, नोचा-घसीटा, ले ली जान, दहला देगा ये Video
पूरी खबर: https://t.co/bMHSqCmbE5#DogAttack #DogMenace (@Jay_Apoorva18) pic.twitter.com/FhL7oYZuZF— AajTak (@aajtak) February 21, 2023
संपादकीय भूमिकाभटक्या कुत्र्यांची समस्या संपूर्ण देशातील नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. यावर आता केंद्र सरकारने ठोस उपाययोजना काढणे आवश्यक आहे ! |