रेडी येथील यशवंतगडाच्या रक्षणासाठी शिवप्रेमींच्या बेमुदत उपोषणाला आरंभ

यशवंतगडाच्या प्रवेशद्वारावर उपोषणासाठी बसलेले शिवप्रेमी

वेंगुर्ला – तालुक्यातील यशवंतगडाच्या तटबंदीला लागून अवैधरित्या करण्यात आलेले उत्खनन आणि आर्.सी.सी. बांधकाम यांना उत्तरदायी असलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील शिवप्रेमी तथा भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण प्रांताचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन रेडकर आणि भूषण मांजरेकर अन् त्यांचे सहकारी यांनी २० फेब्रुवारी या दिवशी गडाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषणाला आरंभ केला.

उपोषणस्थळी वृंदावन, मथुरा येथील कृष्णदेव मिश्रजी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विधिवत् पूजा केली, तसेच श्री श्री मित्राजी महाराज (अध्यक्ष मित्राजी आश्रम), श्री शेषजी महाराज, महंत श्री सुखदेवजी महाराज, श्री आकाशानंदजी, अंशुमानाचार्यजी, रामाशंकर जी (श्री वृंदाश्रमधाम) यांनी उपोषणस्थळी येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले आणि उपोषणास समर्थन दिले, असे राजन रेडकर यांनी सांगितले.

हे पण वाचा आणि पहा –

 रेडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील यशवंतगडाला अवैध बांधकामामुळे धोका !
https://sanatanprabhat.org/marathi/653643.html

 यशवंतगडाच्या शेजारी चालू असलेल्या बांधकामाला ग्रामपंचायतीची अनुमती नाही !
https://sanatanprabhat.org/marathi/654363.html

 गडदुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण नियोजित षड्यंत्र असल्याने पुरातत्व विभागाने काम करण्याची आवश्यकता ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
https://sanatanprabhat.org/marathi/654363.html

 Yashwantgad in Redi (Sindhudurg, Maharashtra) vulnerable illegal construction !
https://www.hindujagruti.org/news/175528.html