वाकळवाडी (जिल्हा सातारा) येथे ७५ किलो ‘अफू’ जप्त !
वडूज, २० फेब्रुवारी (वार्ता.) – येथील खटाव तालुक्यातील वाकळवाडी या गावात शेतामध्ये लागवड करण्यात आलेला ७५ किलो वजनाचा १ लाख ५२ सहस्र ७०० रुपयांचा ‘अफू’ पोलिसांनी जप्त केला. ‘औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम’ कलमांतर्गत शांताराम रामचंद्र मोप्रेकर, चंद्रभागा शिवाजी मोप्रेकर, विमल पंढरीनाथ मोप्रेकर या तिघांवर वडूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.