शिवसेनेच्या आमदारांच्या पात्र-अपात्रतेविषयी सर्वाेच्च न्यायालयात ३ दिवस होणार सुनावणी !
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांमध्ये चालू असलेल्या वादातील आमदारांच्या पात्र-अपात्रतेविषयीची सुनावणी पुन्हा २१ फेब्रुवारीपासून सर्वाेच्च न्यायालयात चालू होणार आहे. ही सुनावणी सलग ३ दिवस चालणार आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपिठापुढे होणार आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह दिल्यामुळे याचा परिणाम या खटल्यावर होण्याची शक्यता आहे.