उल्हासनगर येथे हिंदुत्वनिष्ठावर आक्रमण करणार्या धर्मांधाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !
ठाणे, २० फेब्रुवारी (वार्ता.) – छातीवर पाकिस्तान लिहिलेल्या आणि हिंदुत्वनिष्ठावर आक्रमण करणार्या धर्मांधाच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
१. उल्हासनगर येथील हिराघाट परिसरात महाशिवरात्रीनिमित्त जत्रा उभारण्यात आली होती. जत्रेमध्ये एका मुसलमानाने खेळाचा पाळणा उभारला होता. त्यात बसतांना एका हिंदुत्वनिष्ठाला शेख अब्दुल रिजवान रजाक या पाळणाचालकाच्या छातीवर ‘पाकिस्तान’ असे लिहिलेले दिसले.
२. हिंदुत्वनिष्ठाने याविषयी विचारल्यावर मुसलमानाने धक्काबुक्की करत त्याच्यावर आक्रमण केले.
३. हा तरुण मुंब्रा येथे रहाणारा असून ‘त्याच्या उद्देशाची चौकशी करावी’, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ करत आहेत.
संपादकीय भूमिका
|