सर्दी, खोकला किंवा ताप आल्‍यास उपवास करावा !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १५६

वैद्य मेघराज पराडकर

या दिवसांत होणारे सर्दी, खोकला किंवा ताप हे विकार कफ वाढल्‍याने होतात. हे विकार झाल्‍यास ते लवकर बरे होण्‍यासाठी सकाळी अल्‍पाहार करणे टाळावे. सडकून भूक लागल्‍यावर वरणभातासारखा हलका आहार घ्‍यावा. खोकल्‍यातून कफ पडत असल्‍यास सकाळी आणि सायंकाळी चहाचा पाव चमचा सुंठ चूर्ण घालून वाटीभर गरम पाणी प्‍यावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.२.२०२३)

या मालिकेतील आतापर्यंतचे सर्व लेख एकत्र वाचण्‍यासाठी bit.ly/ayusanatan या लिंकला भेट द्या किंवा बाजूचा ‘क्‍यू.आर्. कोड’ स्‍कॅन करा !

आयुर्वेदाविषयी शंका ayurved.sevak@gmail.com मेल करा !