पिंपरी (पुणे) येथे आचारसंहिता कक्षाकडून ४ सहस्र ‘पोस्टर्स’ आणि ‘बॅनर्स’ यांवर कारवाई !
पिंपरी (पुणे) – चिंचवड पोटनिवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहिता चालू आहे. त्यादृष्टीने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी विविध पथकांकडून प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवले जात आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता कक्षाकडून ४ सहस्रांपेक्षा अधिक ‘पोस्टर्स’, ‘बॅनर्स’ आणि तत्सम फलकांवर कारवाई करण्यात आली आहे, तसेच निवडणुकीसंबंधी आर्थिक अपव्यवहार निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिले आहेत.