गायीच्या धारोष्ण दुधाचे आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्व
(गायीचे दूध काढल्यावर ते मुळात थोडे गरम असते. त्यामुळे त्याला ‘धारोष्ण’ म्हणतात.)
‘गेल्या मासात मकरसंक्रांत आणि रथसप्तमी झाली. या कालावधीमध्ये सर्वांचेच पुष्कळ प्रमाणात तीळगूळ खाणे झालेले असते. अतीप्रमाणात तीळगूळ खाल्ल्याने त्याच्या उष्णतेमुळे डोळे लाल होतात. अशा वेळी काय करावे ? तर गायीच्या धारोष्ण किंवा निरशा (कच्चे) दुधाच्या घड्या डोळ्यांवर ठेवाव्यात. त्यासह गायीचे धारोष्ण दूध पिण्यास द्यावे. जेणेकरून काही जुलाब होऊन त्याद्वारे कोठ्यातील अतिरिक्त उष्णता (पित्त) शरिराच्या बाहेर पडून शरिरात थंडावा निर्माण होण्यास साहाय्य होईल.’
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (३०.१.२०२३)
(संपर्कासाठी ई-मेल : drsameerparanjape@gmail.com)