माझ्या गोमांस खाण्यावर भाजपचा आक्षेप नाही !
|
शिलाँग (मेघालय) – मी भाजपमध्ये असून गोमांत खातो; परंतु माझ्या पक्षाचा, म्हणजे भाजपचा त्यावर काहीही आक्षेप नाही, असे विधान मेघालयाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष अर्नेस्ट मावरी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले. भगवा पक्ष असलेल्या भाजपने गोमांस खाण्याविषयी कुठलीही बंदी घातलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पार्टी के प्रदेशाध्यक्ष अर्नेस्ट मावरी के बयान ने चुनावी हलचल और बढ़ा दी है #BJP #ErnestMawrie https://t.co/AjG5eqqgmc
— AajTak (@aajtak) February 20, 2023
मावरी पुढे म्हणाले की, केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून कुठल्याही चर्चवर आक्रमण झालेले नाही. मेघालयातील मुख्यत्वे ख्रिस्ती पंथाचे पालन करणारे नागरिक आता गोमांसबंदी, नागरिकता नोंदणी कायदा आदींवरून भाजपला पाठिंबा देण्यास सिद्ध आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपने राज्यातील सर्व ६० जागांवर उमेदवार उभे केले असून पक्षाला भरघोस यश मिळेल.