१० वर्षे जुने आधारकार्ड अद्ययावत करण्याचे ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा’चे आवाहन !
नवी देहली – ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण’ म्हणजेच ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ या संस्थेकडे सर्व नागरिकांच्या आधारकार्डची माहिती संकलित करण्याचे दायित्व आहे. प्राधिकरणाने २० फेब्रवारीला त्याच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून भारतीय नागरिकांना आवाहन केले आहे की, जर गेल्या १० वर्षांत त्यांनी आधारकार्डवरील माहिती अद्ययावत केली नसेल, तर ती करून घ्यावी. यामध्ये त्यांची ‘ओळख’ आणि ‘रहिवासी पत्ता’ अद्ययावत करण्याविषयी सांगण्यात आले आहे. ही माहिती ऑनलाईन पद्धतीने अपलोड करण्याचे शुल्क २५ रुपये, तर ऑफलाईन जमा करण्याचे शुल्क ५० रुपये आहे, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
भारत सरकारने सर्व नागरिकांना ‘आधारकार्ड’ जारी करण्याच्या योजनेच्या माध्यमातून विशिष्ट ओळख प्रदान केली. या योजनेचा आरंभ २९ सप्टेंबर २०१० या दिवशी करण्यात आला होता.