बागेश्वरधामच्या दरबारात २२० धर्मांतरितांची हिंदु धर्मात ‘घरवापसी’ !
(घरवापसी म्हणजे पूर्वी धर्मांतर केलेल्या हिंदूंचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश)
छत्तरपूर (मध्यप्रदेश) – बागेश्वरधामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांच्या उपस्थितीत १९ फेबु्रवारीला येथे आयोजित करण्यात आलेल्या दरबारात २२० ख्रिस्त्यांनी घरवापसी केली. पूर्वी हिंदू असलेल्या या २२० जणांनी ख्रिस्ती पंथ स्वीकारला होता. आता त्यांना दीक्षा देऊन त्यांची घरवापसी करण्यात आली आहे, म्हणजे त्यांना पुन्हा हिंदु धर्मात परत आणण्यात आले आहे. बलपूर्वक किंवा आमिष दाखवून धर्मांतर करण्यात आलेल्या आणि आता पुन्हा हिंदु धर्मात परत येऊ इच्छिणार्या हिंदूंसाठी घरवापसी अभियान राबवण्यात येते. धीरेंद्र शास्त्री यांनी अशा प्रकारे आतापर्यंत सहस्रो हिंदूंची घरवापसी केली आहे.
बागेश्वर धाम में 220 ईसाइयों की हिंदू धर्म में घर वापसी, पंडित धीरेंद्र शास्त्री ने कही ये बात, जानिए#BagheshwarDham https://t.co/StuOxYTUKU
— Zee MP-Chhattisgarh (@ZeeMPCG) February 19, 2023