अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार करणार्या मुख्याध्यापकाला अटक !
मुंबई – येथील एका प्रतिष्ठित शाळेमध्ये १४ वर्षांच्या विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार करणार्या शाळेच्या ६५ वर्षीय मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर मुख्याध्यापकाच्या विरोधात पोक्सो आणि भारतीय दंड विधान यांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
The principal of a school was arrested for allegedly sexually assaulting a 14-year-old girl student who was staying in the hostel
(reports @Brezzy_Drive )https://t.co/Z4gipqagKm
— HTMumbai (@HTMumbai) February 19, 2023
ही विद्यार्थिनी इयत्ता ७ वीमध्ये शिकत आहे. शाळेलगत असलेल्या वसतीगृहामध्ये ती रहात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्याचारी मुख्याध्यापक पीडित विद्यार्थिनीला केबिनमध्ये बोलावून तिच्याशी गैरवर्तन करायचा. हा प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी त्याने विद्यार्थिनीला दिली होती. नोव्हेंबर २०२२ पासून मुख्याध्यापक विद्यार्थिनीवर अत्याचार करत होता. याविषयी मुलीने पालकांना सांगितल्यावर पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्याध्यापकाला कह्यात घेतले.
संपादकीय भूमिका
|