संभाजीनगर येथे भरधाव कार थेट दुकानात घुसल्याने दुकानदाराचा मृत्यू !
संभाजीनगर – १८ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजता जिल्ह्यातील वसू सायगाव येथील नागपूर-मुंबई महामार्गावर असलेल्या एका दुकानात भरधाव चारचाकी घुसल्याने दुकानदार रोहित पवार यांचा मृत्यू झाला आहे. याच अपघातात आणखी ५ जण घायाळ झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.