श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी कु. माधुरी दुसे हिच्या सेवेचे कौतुक केल्यावर तिने व्यक्त केलेली कृतज्ञता !
‘मी अतिथी सेवा शिकत असतांना माझ्या समवेत सेवा शिकत असलेली सहसाधिका रुग्णाईत होती. त्यामुळे मी एकटीच ती सेवा करत होते. देवच माझ्याकडून ती सेवा करून घेत होता. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला एका साधिकेजवळ ‘सेवा छान करत आहेस’, असा निरोप पाठवला.
२१.५.२०२१ या दिवशी मला पुढील ओळी सुचल्या. मी प्रतिदिनच्या आढाव्या समवेत त्या ओळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना लिहून पाठवल्या.
अपेक्षा अन् बहिर्मुखता यातून नेत आहात तुम्ही मला स्थिरतेकडे ।
आनंदाचा क्षण हा आज अनुभवला तुमच्या प्रीतीमुळे, प्रीतीमुळे ॥’
– कु. माधुरी दुसे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |