प्रार्थना करतांना साधिकेला स्वतःमध्ये जाणवलेले पालट
१. प्रार्थना करण्यासाठी डोळे मिटले असता प्रार्थनेचे शब्दच न आठवणे
‘पूर्वी मी देवाला प्रार्थना करतांना शब्दरूपात करत असे. मला जे काही सांगायचे असायचे, ते मी शब्दांत सांगत असे. मागील काही दिवसांत माझ्या असे लक्षात आले, ‘मी प्रार्थना करण्यासाठी डोळे मिटले की, मला प्रार्थनेचे शब्दच आठवत नाहीत. मी केवळ डोळे मिटून शांत उभी रहाते आणि डोळे उघडल्यावर मला पुष्कळ शांत अन् हलके वाटते.’
२. प्रार्थनेसाठी डोळे मिटल्यावर माझ्या मनात कोणताही विचार नसतो. त्या वेळी मी स्वतःचे अस्तित्वही विसरलेले असते.
मी एका सत्संगात ही सूत्रे सांगितल्यावर परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘हे चांगले आहे.’’
– सौ. अनघा पाध्ये, ढवळी, फोंडा, गोवा.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |